राधारंग फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

स्पर्धेत हर्षिता राऊळ व हर्ष पवार यांनी मिळविला प्रथम क्रमांक

सावंतवाडी ता.२७-:* परुळेस्थित राधारंग फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या केंद्र पातळीवरील चित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी हर्षिता सहदेव राऊळ हिने व इयत्ता तिसरीतील विद्यार्थी हर्ष महेश पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर विभाग पातळीवर याच शाळेचा महेश रुपेश कातळकर याने यश मिळविले.

राधारंग फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या केंद्र व विभाग पातळीवरील चित्रकला स्पर्धेचा निकाल असून स्पर्धेचे बक्षीस वितरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, हेमंत खानोलकर, पालक तृप्ती राऊळ संजना राऊळ, राधिका कातळकर, विजय ठाकूर, मानवी पवार, रेश्मा चव्हाण आदी उपस्थित होते चित्रकलेचा निकाल पुढीलप्रमाणे इयत्ता चौथी प्रथम हर्पिता सहदेव राऊळ, द्वितीय मानसी प्रवीण डोंगरे, तृतीय संपूर्णा सुधाकर राऊळ, इयत्ता तिसरी प्रथम-हर्ष पवार, तृतीय लावण्य वासुदेव चव्हाण यांनी तर विभाग पातळीवर महेश रुपेश कातळकर यांनी यश मिळविले. शाळेतील तालुका व विभाग पातळीवरील यशस्वी सर्व मुलांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांच्यावतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या

You cannot copy content of this page