सिंधुरत्न योजनेत पर्यटन व्यावसायिकांना समाविष्ट करावे – बाबा मोंडकर

मालवण ता.२७-:* सिंधुरत्न विकास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना समाविष्ट करावे अशी मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर यांनी सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, मत्स्यव्यवसाय, बचतगटातील व्यावसायिकांना यांत्रिकरणाची जोड देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था, रोजगार निर्मितीचे कार्य तुमच्या माध्यमातून उभे होत असताना पूर्ण राज्याने पहिले आहे. या योजनेनंतर सिंधुरत्न योजनेच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी कार्य करत असून या व्यवसाय वाढीसाठी काही प्रमुख आमच्या मागण्या आहेत. यात स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षणासाठी अनुदान योजना राबविणे, नव्याने चालू होणाऱ्या जलक्रीडा, ऍडव्हेंचर प्रकल्प सुरू करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी अनुदान योजना राबविणे, टुरिस्ट परवाना लक्झरी कार खरेदी साठी योजना राबविणे, मच्छिमार रापण संघाच्या कावनांचे मच्छिमार कल्चर सेंटर उभारण्यासाठी योजना राबविणे, सद्यस्थितीत सुरू असलेल्या होम स्टे, हॉटेल मधील रूम ३ स्टार दर्जाच्या होण्यासाठी प्रति रूम योजना राबविणे, पर्यटन व्यावसायिकांना इन्व्हर्टर तसेच जनरेटर खरेदीसाठी योजना राबविणे, जिल्हा पर्यटन सफारीसाठी अद्ययावत बस उपलब्ध करणे, अपिरिचित पर्यटन स्थळे विकासासाठी योजना राबविणे, सिंधुरत्न योजनेच्या कमिटीत पर्यटन क्षेत्राच्या विकासाठी आवश्यक भूमिका मांडण्यासाठी महासंघाच्या एका व्यक्तीची निवड करावी, अद्ययावत पर्यटन माहिती केंद्रसाठी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या कार्यपद्धतीवर महासंघास पूर्ण विश्वास असून महासंघाच्या पर्यंटन वाढीसाठी केलेल्या विनंतीचा विचार करावा असेही श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page