पोलीस दाम्पत्याच्या दातृत्वाने समाजासमोर निर्माण केला आदर्श

मालवण ता.२७-:* कै.जयवंती जगन्नाथ जाधव हिच्या स्मरणार्थ सुनंदा शांताराम पवार व सुलोचना वसंत जाधव यांनी तसेच सुशांत शांताराम पवार व सुप्रिया सुशांत पवार या पोलीस दाम्पत्याने आपली आई सुनंदा शांताराम पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रशाळा मसुरे क्रमांक १ च्या तीन मुली दत्तक घेऊन रोख ९ हजार रुपये प्रशालेस देऊन एक समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या सुशांत पवार व सुप्रिया पवार या पोलीस दांपत्य असलेल्या उभयतांना पोलीस दलातील कामकाजाबाबत विविध प्रश्न विचारून पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती करून घेतली. विद्यार्थ्यांनीही कायद्याचे ज्ञान घेणे आज गरजेचे आहे.

तसेच आपल्या प्रशालेची आण बाण शान वाढविण्यासाठी भविष्यात मोठे झाल्यावर प्रयत्न करावा असे आवाहनही पवार दाम्पत्याने यावेळी केले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसूरकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मसुरे क्रमांक एकच्या मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, विनोद कदम, गुरुनाथ ताम्हणकर, श्री.गावडे, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, हेमलता दुखंडे तसेच सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले. गुरुनाथ ताम्हणकर यांनी आभार मानले. यावेळी पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पवार दाम्पत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

You cannot copy content of this page