सुकळवाड ब्राम्हणदेव मंदिरात १ पासून दशावतारी नाट्य महोत्सव

सिंधुदुर्गनगरी ता २६ श्री ब्राम्हणदेव सुकळवाड मंदिर येथे १ ते ५ मे या कालावधीत कै.अरुण हिंदळेकर स्मृती दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ब्राम्हणदेव सुकळवाड येथील वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा ५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या निमित्त १ मे ते ५ मे या कालावधीत कै. अरुण बाबाजी हिंदळेकर स्मृती दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये १ मे रोजी मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमांड, २ मे रोजी वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली, ३ मे रोजी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला, ४ मे रोजी महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी, तर ५ मे रोजी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण,इत्यादि नाट्य मंडळाचे रोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग होणार आहेत. वरील सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी व नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री देव ब्राह्मण सेवा समिती सुकळवाडच्या वतीने केले आहे.

You cannot copy content of this page