टायर फुटल्याने माल वाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावर पलटी…

वैभववाडी प्रतिनिधी अचानक टायर फुटल्याने माल वाहतूक करणारा टेम्पो रस्त्यात पलटी झाला. ही घटना करूळ – एडगांव सीमेनजीक पहाटे चारच्या सुमारास घडली.

ट्रक चालक या अपघातात बालबाल बचावला आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोल्हापूरहून मालवणकडे टेम्पो (क्र. एमएच 04 -एफवी- 0059) चालक दत्तकुमार साबळे घेऊन जात होते. एडगांव क्रशर नजीक अचानक टेम्पो चा टायर फुटला. व टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. दरम्यान इतर वाहन चालकांने जखमी साबळे यांना बाहेर काढले. चालक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गाडीत असलेल्या मालवण मधील व्यापा-यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page