रस्त्यावर सापडलेले 500 रुपये केले पोलिसांकडे सुपूर्द…
वैभववाडी प्रतिनिधी माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथील विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा दाखवीत रस्त्यावर सापडलेले 500 रुपये वैभववाडी पोलिसांकडे सुपूर्द केले. भूपाल महेश रावराणे, वैभव उमेश सावंत, राजू संतोष पावसकर या विद्यार्थ्यांनी मिळालेले पैसे घेऊन वैभववाडी पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार नितीन खाडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी यासंदर्भात पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांना माहिती दिली.
पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी विद्यार्थ्यांचा प्रामाणिक मला पाहून विद्यार्थ्यांना कॅडबरी चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये लहान लहान वयापासूनच प्रामाणिकपणा जोपासण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक व श्री पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री संदीपकांबळे नितीन खाडे ,आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. फोटो- विदयार्थ्यांना कॕटबरी देऊन कौतुक करतांना पोलिस निरीक्षक अतुल जाधव.व सहकारी . छाया- संजय शेळके वैभववाडी
