श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त मळगाव येथील मठात शंतचंडी यागाचे आयोजन

सावंतवाडी ता.२३- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिनी गुरुवार 28 एप्रिल रोजी शतचंडी याग आयोजित करण्यात आला आहे. श्री स्वामी भवन मळगाव पिंपळवाडी येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी दर्शन तसेच दुपारी होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

यानिमित्त विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यात सोमवार 25 एप्रिल रोजी सकाळी ८.०० वा. देवीची स्थापना आणि पुण्याहवाचन, संध्या. ७.०० वा. भजनाचा कार्यक्रम (वजराठ), मंगळवार 26 रोजी सकाळी ८.०० वा. शतचंडी पाठ / सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वा. कुंकुमार्जन सायं ७.०० वा. श्री सुधीर नाईक आणि सहकारी यांचा गायनाचा कार्यक्रम ९.०० वाजता भजनाचा कार्यक्रम ( माजगाव), बुधवार 27 रोजी सकाळी ८.०० वा. शतचंडी पाठ व हवन, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वा. कुंकुमार्जन, संध्या. ४ ते ६ देवीची चौसष्ट कलांनी पूजा संध्या. ७.०० वा.ह.भ.प. श्री. कालेलकर बुवा (कालेली) किर्तनाचा कार्यक्रम व गुरुवार 28 रोजी सकाळी हवन, पर्णाहुती, आरती दुपारी महाप्रसाद, सायं. ४.०० वा. श्री. राजू जोशी यांचे अध्यात्मावर प्रवचन, सायं.६.०० वा. महाआरती , सायं. ७.०० वा. श्री. सुनिल पाडगांवकर यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे

You cannot copy content of this page