तर “त्या” क्लिप खा राऊत यांना देतो

भोंगा प्रकरणी आरोपावरून मनसे आक्रमक;खा विनायक राऊत यांच्यावर अमित इब्रापूरकर यांचा पलटवार

मालवण ता.२०-:* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे काढलेच पाहिजेत हे भरसभेत सांगितले होते. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध केला व तिथे महाआरत्यांचे आयोजन केले त्यावेळी दंगल होणार नव्हती काय? राज ठाकरे यांच्यावर सुपारी घेऊन दंगल घडवण्याचा आरोप करणाऱ्या खा. विनायक राऊत यांनी इतिहासाची आठवण ठेवावी.

खासदार राऊत हे सत्तेत राहून भ्रमिष्ठ झालेले असतील तर त्यावेळच्या शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाच्या क्लिप्स आमच्याकडे आहेत त्या पाठवून देवू असा सणसणीत इशारा मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे राज ठाकरे हे महाराष्ट्रात दंगली घडवण्याची सुपारी घेत असल्याच्या खासदारांच्या टिकेचा समाचार मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून घेतला आहे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख बाळासाहेबा ठाकरे यांनी हिंदुंच्या रक्षणासाठी,व्यापक हिंदुत्वाचा नारा देत शिवसेना पक्ष वाढवला याची आठवण खासदार विनायक राऊत यांनी ठेवावी. सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने हिंदुत्व बाजुला ठेवलं आणि राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी युती केली.

हे शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आहे हे खासदार राऊत यांना मान्य करावेच लागेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यासाठी मनसे पक्षाची स्थापना केली. हे खासदार राऊत यांनी लक्षात ठेवावे . शिवसेना प्रमुख यांच्याकडून हिंदुरक्षणासाठी राज ठाकरे यांनी ‘बाळकडू घेतलं आहे . हिंदुह्दयसम्राट ही बाळासाहेबांची नावासमोरची उपाधी राज ठाकरे यांनी स्वतः घेतली नाही. आज खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेउन जाण्याचा प्रयत्न राज ठाकरे हे करत आहेत असेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page