*⚡मालवण ता.२०-:* आचरा हिर्लेवाडी येथील कै आशालता शिर्सेकर यांच्या स्मती प्रित्यर्थ शुक्रवार २२ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेकडून मोफत आँपरेशन, व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरात ब्लडप्रेशर तपासणी, मोफत जनरल औषधे, डिजिटल ईसीजी, डोळे तपासणी आदी केली जाणार आहे. या आरोग्य शिबीरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी नाव नोंदणीसाठी रामेश्वर टुर्स अँड ट्रव्हलर्स मोबा नंबर ७५८८९०२९७० यांच्याशी संपर्क साधावा तरी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिर्सेकर कुटुंबीय हिर्लेवाडी व उपसरपंच पाडूरंग वायंगणकर यांनी केले आहे
