वेंगुर्ला प्रतिनिधी– तुळस येथील श्री जैतीर विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी मावळते उपाध्यक्ष संतोष शेटकर यांची तर उपाध्यक्षपदी संजय परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे हित लक्षात घेत गावातील सर्व पक्षियांनी एकजूट दाखवत श्री देव जैतीर गाव विकास पॅनेलच्या झेंड्याखाली कार्यकारी मंळाची निवड केली होती. २० एप्रिल रोजी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर सर्व पक्षियांनी एकत्र येत शिक्कामोर्तब केले.
यावेळी तुळस सरपंच शंकर घारे, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी मंडळ सदस्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.
यावेळी उपसरपंच सुशिल परब, जयवंत तुळसकर, आप्पा परब, समीर शेटकर, निलेश नागवेकर, राजन आरोसकर, नारायण कुंभार, प्रदिप सावंत, सुनिल तुळसकर, सागर सावंत, प्रल्हाद राणे, ज्ञानेश्वर केळजी वगैरे ग्रामस्थ उपस्थित होते. सहकार क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता गाव विकासासाठी सर्वांनी कटीबद्ध रहावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केलेल्या छोटेखानी भाषणाप्रसंगी केले. निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून एस.एल.कावले यांनी काम पाहिले.
