खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम के गावडे होते उपस्थित
वेंगुर्ले सन २०२२ खरीप हंगाम आढावा बैठक वेंगुर्ले तालुका खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयात चेअरमन एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
खत कंपन्यांनी आपले विक्री धोरण बदलले असल्यामुळे खत रक्कम रोख द्यावी लागते.नेहमी पावसाळ्यात होणारी अडचण लक्षात घेऊन यावेळी येत्या खरीप हंगामात संस्थानी काही रक्कम आगाऊ जमा केल्यास वेळीच खत पुरवठा करणे सुलभ होऊ शकेल. झुआरी ऍग्रो व आर सी एफ कंपनीच्या प्रतिनिधीबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली.त्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खत पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.
उपस्थित संस्था प्रतिनिधीनी आपापल्या संस्थांची खत मागणी संघाकडे दिली आहे. ज्या संस्थांनी मागणी दिलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर मागणी नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संस्थांनी योग्य प्रतिसाद दिल्यास शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना वेळीच खत पुरवठा केला जाईल,याबाबतीत कुठेही अडचण येणार नाही. तसेच संस्थांनी ऍडव्हान्स रक्कम देण्याचे मान्य केले आहे.
खताच्या किमती फार मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, शासनाने याचा विचार करावा. तसेच खताच्या किमती वाढल्या तरी संस्थांना मिळणारे कमिशन हे फारच कमी आहे. खत विक्रीचा व्यवसाय प्रसंगी आपले पैसे खर्च करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा लागतो. कमिशनबाबत संस्थेच्या सर्व प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा उद्योग करावा लागतो, असे यावेळी नमूद केले. यावेळी जिल्हा बँकेचे विकास अधिकारी भाग्येश बागायतकर, डी.आर.आजगावकर,मठ संस्थेचे चेअरमन सुभाष बोवलेकर, संस्था प्रतिनिधी राजबा सावंत, बाळकृष्ण गोगटे, अण्णा मातोंडकर, उल्हास फणसेकर,मठ संस्थेचे सचिव फडतरे, बाळू दळवी, नंदू राणे, संस्था कर्मचारी आदी उपस्थित होते फोटो : खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलताना तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम.के.गावडे, सोबत अन्य
