वेताळ बांबर्डे येथील आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा आरोग्य तपासणी शिबीर उपक्रम…

*⚡कुडाळ ता.१३-:* मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनी हेल्थकेअर क्लिनिक,मुंबई व जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सभागृह येथे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गाकडे व सचिव राजेश टंगसाळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सदर शिबिरास वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने संपूर्ण शारीरिक तपासणी,ऍक्युप्रेशर व फिजिओथेरपी आणि मधुमेह,थायरॉईड,कॅन्सर,सिरम कॅल्शियम,हिमोग्लोबिन आदी रक्त तपासणीचा सुमारे शंभराहून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला.गावच्या सरपंच सौ संध्या मेस्त्री व उपसरपंच दिनेश कदम,ग्रामविकास अधिकारी बी.डी.पिंटो यांनी शिबिरासाठी उपस्थित डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व मनसे पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.मनसेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल वेताळ बांबर्डे वासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page