नांदगाव विकास सोसायटीवर शिवसेना प्रणित पॅनलचे दणदणीत विजय

१३ ही जागांवर विजय; भाजपचा धुव्वा

कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील बहुचर्चित सोसायटी निवडणुकीत भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेची केल्यानतंर येथे झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर लागलेल्या निकालात नांदगाव विविध विकास सहकारी सोसायटीत शिवसेना प्रणित बळीराजा पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवत भाजप प्रणित सिध्दविनायक पॅनलचा धुव्वा उडवित सर्व जागांवर विजय संपादन केला. यावेळी विजयानंतर नांदगाव सोसायटी कार्यालय व नांदगाव तिठ्ठा येथे एकच जल्लोष केला.

निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कर्जदार गटातून श्री.विजय कदम 245,दिपक कांडर 242,आब्बास बटवाले 244,विठोबा महाडेश्वर 248 ,गौरीशंकर खोत 250,अतुल सदडेकर 238,अनिल चव्हाण 229,प्रकाश सातोसे 246,महिला प्रतिनिधी मधून हसीना बटवाले 280,प्रभावती माळकर 256, तर इतर मागस प्रवर्ग गटातून शामसूंदर मोरये 284,भटका विमुक्त जाती मधून तात्या निकम 284, अनुसूचित जाती जमाती मधून धर्माजी तांबे 280 यानी घवघवीत यश संपादन केले. विजयानंतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होत विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. यावेळी संपूर्ण निवडूकीचे किंगमेकर गौरीशंकर खोत,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,कैन्हया पारकर, सचिन सावंत, रिमेश पावसकर, नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर,माजी चेअरमन रविंद्र तेली,अरूण बापार्डेकर यानी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. तब्बल 78 वर्षाच्या कालावधीत एकदाच या सोसायटीची एका जागेसाठी निवडणूक झाली होती. यानतंर यावर्षी निवडणूक झाली यात शिवसेनेने बाजी मारली.यावेळी गौरीशंकर खोत यानी हा विजय वैचारीक असून नांदगाव सोसायटीतील सहा गावातील शिवसेना पदाधिकारी, मतदार,ग्रामस्थ यानी सांघिक काम केल्यामुळेच हा विजय असल्याचे सांगितले. तर सतीश सावंत यानी गौरीशंकर याची चाणक्यनितीमुळे हा विजय असून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले.

You cannot copy content of this page