बांदा येथे शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निमजगा व शाळा बांदा सटमठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला सोहळा…

बांदा ता.१३-:* जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे शाळा बांदा निमजगा व शाळा बांदा सटमठ यांच्या संयुक्त माध्यमातून शाळेत शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

जि प पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे सन 2022-23 इयत्ता 1 ली मध्ये दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांचां शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यास बांदा सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, निमजगा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर , सटमटवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीक्षा मावळणकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत , शैलेश शेटकर, आनंद देसाई , केंद्र प्रमुख एस डी गवस, सर्व शिक्षा अभियान विषय तज्ञ प्रसाद सांगेलकर, स्वप्निल राहूळ, अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, देवयानी डेगवेकर, श्रीमती आमेलकर, श्रीम गावडे, श्रीमती शोभा बांदेकर, चारुशीला परब सर्व बांदा बीट अंगणवाडी ताई, मदतनीस, उपस्थित होते.

प्रथम इयत्ता 1 ली दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांनची प्रभात फेरी काढण्यात आली. त्याप्रमाणे सर्व दाखल पात्र मुलांचे मुख्याध्यापक श्रीमती प्राजक्ता राऊळ, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मुलांना ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित राहून एकूण अभ्यासक्रम निगडित 7 स्टॉल लावण्यात आले. यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत, मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक प्राजक्ता राऊळ केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद राऊळ मुख्याध्यापक बांदा सटमठवाडी यांनी केले. तसेच सूत्र संचालन सुवर्णा भाईप, व आभार लुईजा गोन्सालवीस यांनी मानले. मालू लांबर उपशिक्षक, मंगल दराडे उप शिक्षिका , प्रशांत पवार उपशिक्षक बांदा सटमठवाडी तसेच अंगणवाडी ताई, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page