वेंगुर्ला ता.१३-:* वेतोरे येथे ग्राहक व विक्रेते यांची सोय व्हावी यासाठी वेतोरे -वरचीवाडी ग्रामपंचायत कार्यालय आवारात दर शुक्रवारी आठवडा बाजार सुरु केला होतो. मात्र, कोरोना कालावधीत हा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा हा आठवडा बाजार सुरु करण्यात आला आहे. या आठवडा बाजाराचा वेतोरे, पालकरवाडी, दाभोली, खानोली, आडेली, मठ परिरातील विक्रेते व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच राधिका गावडे यांनी केले आहे.
वेतोरे-वरचीवाडी येथे आठवडा बाजार सुरु
