विनापास वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर वाहतूक पोलिसांची कारवाई…

सावंतवाडी ता.१२- विनापास वाळू वाहतूक करण्या डंपरवर काल रात्री १२ च्या सुमारास इन्सुली येथे वाहतूक पोलीसांनी कारवाई केली असून, तो डंपर तहसिलदारांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत खुद तहसिलदार यांनी दुजोरा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विनापास वाळू वाहतूक होणार अशी गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले.

You cannot copy content of this page