सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई

राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवींनी वेधले लक्ष;पालिकेचे बिल न भरल्याने पुरवठा खंडीत

सावंतवाडी, ता. ९ : उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई निर्माण झाली असून रूग्णांचे हाल होत आहेत. नगरपालिकेचे बील अदा न केल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला असून विहीरीतील पाणी आटले आहे. बंबाने होणारा पाणीपुरवठा मुबलक नसल्यानं रूग्णांचे हाल होत असून राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी याची दखल घेत रुग्णालयात धडक दिली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सावंत यांच्याशी चर्चा करत प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी हा प्रश्न मार्गी लावण्याच आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग हिदयतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकर राजगुरू, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जावेद शेख, अर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग याकुब शेख, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रेवती राणे, महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, कौसतुभ नाईक, किरण सावंत, निलेश म्हाडगुत, महादेव नाईक, महिला सरचिटणीस सौ. रंजना निर्मळ, माजी सभापती आर. के. सावंत, मनोज वाघमोरे, जिल्हाध्यक्ष व्ही. जे. एन. टि. अशोक पवार, तालुकाध्यक्ष पदवीधर संघ प्रसाद दळवी, संदीप राणे, शफीक खान, असिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा तालुका कार्यकारणी सदस्य ऑगस्तीन फर्नांडिस आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page