सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे वेधले लक्ष
कणकवली ता.०२-:* सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये कृषी प्रदर्शन सन 2017-18 मध्ये झालेले होते. त्यानंतर सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21 या 3 आर्थिक वर्षात कृषी प्रदर्शन झालेले नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी प्रदर्शन होनेसाठी मनोमन इच्छा आहे. तरी मे महिन्यामध्ये कृषी प्रदर्शन भरविण्यात यावे अशी मागणीसिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सदस्य सतीश सावंत यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
पालकमंत्री नाम.उदय सामंत यांना सादर केलेल्या निवेदनात सतीश सावंत म्हणतात, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिने कृषी प्रदर्शन होणे आवश्यक आहे. तरी या संदर्भात योग्य ते नियोजन करणेसाठी आपल्या स्तरावरून सबंधित जिल्हा परिषद प्रशासन, राज्य कृषी अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी यांना निर्देश देणेत यावेत, अशी मागणी सतीश सावंत यांनी केली आहे.
