कोकिसरेत मिळाला मृत गवारेडा

वाहन, रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय

वैभववाडी ता.०१-: कोकिसरे येथील जंगलात गवारेडा मृतावस्थेत आढळून आला आहे. पायाला गंभीर दुखापत असलेल्या सदर गव्याचा मृत्यू वाहनाच्या किंवा रेल्वेच्या धडकेत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कोकिसरे येथील विनोद आनंद आयरे यांच्या मालकीच्या जंगलात गवारेडा (मादी) मृत अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आला. गावातील श्री परेश सावंत यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वैभववाडीचे वनपाल एस. एस. वागरे, वनरक्षक अमीर काकनीवर, वनरक्षक उत्तम कांबळे, वनरक्षक नंदू लोखंडे हे प्रत्यक्ष जागेवर पोहचले. मॄत गवारेडायाची पहाणी करुन पक्षुवैदयकिय अधिकारी वैभववाडी यांना त्यांनी पाचारण केले. मॄत गवारेड्याचे शवविच्छेदन केले. गवारेड्याचा मागील डावा पाय मोडलेला असून पुर्ण हाड बाहेर आल्याचे दिसून आले. सदर गवारेडा चारचाकी वहानाची किंवा रेल्वेची धडक बसून पाय मोडलेला असावा. त्याला जागेवरुन चालता येत नव्हते. अन्न, पाणी, न मिळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, गवारेडा दाटझाडीत असल्याने कोणाच्या निदर्शनास आलेला नाही. अधिक तपास वनविभाग करत आहे.

You cannot copy content of this page