गणित प्राविण्य परीक्षेत मिळविले यश;गणित प्रज्ञा परीक्षेसाठी झाली निवड
सावंतवाडी ता.०१-:* सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेमध्ये माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेतील नववीतील विद्यार्थिनी गौरी अभय देसाई हीने उज्ज्वल यश संपादन केले असून तिची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.
गौरी देसाईच्या या अभिनंदनीय निवडीबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे तसेच दहावीसाठी घेण्यात आलेल्या गणित पारंगत परीक्षेत प्रशालेतील 20 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सुमारे 17 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन गणित पारंगत परीक्षेचा निकाल 85% इतका लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थाध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, मुख्याध्यापिका माधवी सावंत, शालेय समिती यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले
