कुंपणाच्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची सुटका

मालवण ता.२२-:* मालवण भरड- रेवतळे भागात कुंपणाच्या जाळ्यात अडकलेला अजगर लहान मुलांना दिसून आल्यानंतर सर्पमित्र हर्षल मालाडकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुटका करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. भरड रेवतळे मार्गावरील अरविंद वास्तू कॉम्प्लेक्स समोरील सध्या पडीक असलेल्या आणि झाडेझुडपे वाढलेल्या जागेच्या कुंपणाला असलेल्या जाळ्यात एक मध्यम आकाराचा अजगर अडकून पडल्याचे तेथून जाणाऱ्या काही छोट्या मुलांना दिसून आला.

या मुलांनी ही बाब जवळपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नागरिकांनी सर्पमित्र हर्षल मालाडकर यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र हर्षल मालाडकर यांनी त्याठिकाणी धाव घेतली. जाळ्यातून सुटका करण्याच्या प्रयत्नात अजगराच्या अंगावर घट्ट बसलेले जाळे कापून काढले. यासाठी येथील नागरिक नागरिक वरावडेकर यांनी मदत केली. सर्पमित्र मालाडकर यांनी अजगराची सुटका करून त्या अजगराला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले. लहान मुलांचे प्रसंगावधान आणि सर्पमित्र हर्षद मालाडकर यांनी दाखविलेली तत्परता यामुळे एका अजगाराचे प्राण वाचले याबद्दल प्राणीमित्रांनी समाधान व्यक्त केले आहे. 

You cannot copy content of this page