निवडणुकी नंतर दोन्ही पक्षांनी कार्यकारणी केली होती बरखास्त…
दोडामार्ग ता.२०-:* कसई दोडामार्ग नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नगरपंचात मध्ये शिवसेनेचा झालेला पराभव तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात अंतर्गत गटबाजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड वेळी भाजपाच्या वरिष्ठांचे आदेश पाळले गेले नाहीत.असा ठपका ठेवून दोडामार्ग तालुका भाजपा कार्यकारिणी बरखास्त केली होती.तर शिवसेनेचा झालेला पराभव याला काही पदाधिकारी जबाबदार आहेत असा ठपका काही शिवसेना पदाधिकारी यांनी ठेवला होता.आणि शिवसेना तालुका कार्यकारिणी शिवसेना नेते अरुण दुधवडकर यांनी बरखास्त करत असल्याचे जाहीर केले होते
.पण बराच कालावधी उलटला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक बिगुल वाजायचे आहे.पण तालुक्यातील जबाबदारी कुणावर दिली जाणार या संदर्भात भाजपा शिवसेना नेते मंडळी कडून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही त्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
