दोडामार्ग ता.१९-:* साटेली गावातील जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी श्री देव पुरमार,श्री देव चाळोबा देवस्थान वार्षिक शिमगोत्सवाला होळी पौर्णिमेपासून धुमधडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे.होळीच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण गावात देवाचे चोर फिरवणे ही पारंपरिक प्रथा आजही जोपासली जात आहे.शनिवार देवतांच्या मंदिराकडून चोर फिरवणे सुरूवात झाली.ढोलताशांच्या गजरात संपूर्ण साटेली गावात चोर फिरवणे हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.
साटेली गावातील सात दिवसांच्या वार्षिक पारंपारिक शिमगोत्सव होळी पौर्णिमेपासून सुरू झाला . गावातील दोन्ही मंदिराच्या ठिकाणी तसेच आवाडा चाळोबा देवस्थान,पाटेकर देवस्थान येथे होळ्या उभ्या करून सुरूवात करण्यात आली.
