सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी शहरात आज ठिकठिकाणी पाच दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे गेले दोन वर्ष एकदम साध्य पध्दतीने शिमगोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शिमगोत्सवास उत्साहात सुरुवात झाली.
सावंतवाडी शहरात चितारआळी, सालईवाडा, वैश्यवाडा, खासकीलवाडा, जुना बाजार, शिरोडानाका, उभाबजार आदी ठिकाणी होळी उभारण्यात आली. सावंतवाडीचा शिमगोत्सव पाच दिवसांचा साजरा करण्यात येणार आहे. या पाच दिवसात धुलीवंदन, रंगपंचमी आदी कार्यक्रम होणार आहेत.
