टीचर टॉक फोरम’ वैभववाडी तालुकाध्यक्षपदी संदेश तुळसणकर

सचिवपदी सागर पेंडूरकर यांची निवड ;एस.आर.दळवी फौंडेशनची कार्यकारणी जाहीर

वैभववाडी ता.१७-:* एस.आर.दळवी फाऊंडेशन या मुंबईस्थित सर्व स्तरावरील शिक्षकांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेची वैभववाडी तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी संदेश तुळसणकर (अर्जून रावराणे विद्यालय वैभववाडी) यांची निवड करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष (सदस्यत्व विकास) पदी श्री. प्रफुल्ल जाधव (महालक्ष्मी विद्यामंदीर कोकिसरे), उपाध्यक्ष (कार्यक्रम) पदावर संध्या शेळके (विद्यामंदीर गडमठ तेलीवाडी) यांची नियुक्ती झाली आहे. तालुका सचिव पदी सागर पेंडूरकर (विद्यामंदीर आखवणे नं 1), सहसचिव राजेश कळसुलकर (श्री रामेश्वर विद्यामंदीर एडगांव नं 1) यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. महेश लाडू सावंत यांनी सदर कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली आहे. शिक्षक सक्षमीकरण हा संस्थेचा मूळ उद्देश असून शिक्षकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

फाउंडेशनचे संस्थापक श्री. रामचंद्र दळवी आणि श्रीम. सीता दळवी यांनी शिक्षकांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत असे सांगितले आहे. शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणारे सर्व शिक्षक या संस्थेच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. फाऊंडेशनने ‘टीचर टॉक’ हे ॲप विकसित केले आहे. त्या माध्यमातून शिक्षकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या आपच्या माध्यमातून शिक्षक एकाच व्यासपीठावर येणार असून विचारांची देवाण-घेवाण करता येणार आहे.

तसेच या ॲपच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील अनुभवी शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा येथील शिक्षकांना होणार आहे. आत्तापर्यंत विविध उपक्रम फाऊंडेशन मार्फत राबविले गेले आहेत. संस्थेचे प्रमुख पदाधिकारी श्री. नयन भेडा सर तसेच श्रीम. लक्ष्मी अय्यर मॅडम यांनी निवडीबद्दल सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाध्यक्ष श्री. महेश सावंत , जिल्हा सचिव श्री. चेतन बोडेकर आणि जिल्हा कार्यकारिणीमधील सर्व सदस्यांनी नूतन वैभववाडी तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले. फोटो – संदेश तुळसणकर सागर पेंडुरकर प्रफुल जाधव संध्या शेळके

You cannot copy content of this page