घोणसरी येथे अखेचा दिला निरोप
*💫कणकवली दि.०९-:* वाहतूक पोलीस विभागातील पोलीस हवालदार बस्त्याव मोतेस पिंटो यांच्यावर आज कणकवली तालुक्यातील घोणसरी गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.पिंटो यांचे हृदय विकाराच्या झटक्याने शुक्रवारी दुपारी ड्युटीवर असतांनाच निधन झाले होते. आज घोणसरी येथे चर्चच्या परिसरात ख्रिश्चन धर्माच्या प्रथेप्रमाणे अंतविधी करण्यात आला.पोलीस पथकाने शस्त्र सलामी देत शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला.यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक श्री.धुमाळ,वाहतूक पोलीस विभागाचे एपीआय अरुण जाधव यांच्या सह गावातील अंख्य नागरिक, सरपंच,पोलीस पाटील आदी उपस्थित होते.बस्त्याव पिंटो यांना शाश्रूंयनाने निरोप देण्यात आला. पिंटो यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.गेली अनेक वर्षे पोलीस सेवेत असल्याने होते.बस्त्याव पिंटो यांचा मोठा लोक संग्रह होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
