मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा जत्रोत्सव उत्साहात…!

*💫सावंतवाडी दि.०९-:* मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून उत्साहात साजरा झाला. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. जत्रोत्सवानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळपासून श्री देवी माऊलीची ओटी भरणे, दोन पूर्वस देवाला केळी नारळ ठेवणे, आदी कार्यक्रम झाले. रात्री ढोलांच्या गजरात सवाद्य भव्य पालखी मिरवणूक व त्यानंतर खानोलकर दशावतार मंडळाने ‘अंगरिका व्रत, हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला. मळगाव परिसरातील भाविकांनी जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page