*कॅन्सर ग्रस्ताच्या मदतीला मानवाधिकार ट्रस्ट गेले धाऊन

सावंतवाडी : मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे शाहुवाडी तालुका पदाधिकारी संजय पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्या उपचाराचा खर्चही त्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडण्यासारखा नाही होता. अशावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून गेले आहेत. मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद यासीन शेख साहेब व मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर, मानव अधिकार युवक प्रदेशाध्यक्ष डॉ. आजाद नायकवडी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष महेश नंदे यांच्या प्रयत्नातून त्यांचे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले शासकीय जन आरोग्य योजनेतून मोफत मध्ये झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की राजाराम पाटील यांना कॅन्सर आहे. हे निश्चित झाल्यानंतर त्यांचे लहान बंधू संजय पाटील यांनी ही गोष्ट मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद यासीन शेख यांना सांगितली होती. शेख साहेब यांनी आपल्या’ मदतीसाठी सदैव तत्पर’आपल्या ब्रीद वाक्य प्रमाणे ताबडतोब त्यांना मदत करण्याचे निश्चित केले. त्यांनी आपले मित्र स्टार हॉस्पिटलचे डॉक्टर अतीक शेख यांच्या मदतीने डॉक्टर बाफना यांच्याशी विचारविनिमय करून त्यांना ऑपरेशन साठी स्टार हॉस्पिटलमध्ये अगदी कमी खर्चात फिट केले. व त्यांना अॅपल सरस्वती हॉस्पिटल येथे ऑपरेशन साठी ऍडमिट करण्यात आले. तेथे त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून ऑपरेशन करण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु त्यामध्ये काही अडचणी येत होत्या त्या सोडवण्यासाठी मानवाधिकार युवक प्रदेशाध्यक्ष डॉक्टर आजाद नायकवडी यांची खूपच मदत झाली. अॅपल सरस्वती हॉस्पिटलचे पोटविकार तज्ञ डॉक्टर सागर उरुणकर यांनी राज्याच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या वरिष्ठ डॉक्टर टीमशी बोलून त्यांना त्या ऑपरेशनचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याकडून मंजुरी मिळवली. त्यांच्यावर कॅन्सरची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. एक मध्यमवर्गीय कुटुंब उद्ध्वस्त होता होता वाचले आहे. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी श्री शेख  व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता देखील आहे.

You cannot copy content of this page