पाडलोसमध्ये मायनिंग वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

ग्रामस्थ व डंपर चालकांत शाब्दित बाचाबाची : ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे माघारी परतले

*💫बांदा दि.०८-:* भरधाव वेगाने अन् परवानगी नसताना सुद्धा पाडलोसमार्गे रेडीला जाणारे तीन मायनिंगने भरलेले डंपर आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पाडलोस रवळनाथ मंदिराजवळ ग्रामस्थांनी रोखले. प्रशासनाने वाहतुकीसाठी दिलेला मार्ग न अवलंबता पाडलोसमार्गे सुसाट वेगाने जात असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. डंपरचालक व ग्रामस्थांत शाब्दिक बाचाबाचीही झाली. परंतु ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे त्या डंपरचालकांना पुन्हा माघारी परतावे लागले. कळणे-बांदा-सावंतवाडी-मळगाव ते निरवडे-मळेवाड-आरोंदा-रेडी या मार्गावरून मायनिंग वाहतूक सुरू असते. परंतु बांदा-पाडलोस मार्गे धावणाऱ्या डंपरमुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली. काही नागरिकांनी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांच्याकडे अनेक तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राजू शेटकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी मायनिंगने भरलेले डंपर माघारी परतवून लावले. तसेच सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी उद्या यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे राजू शेटकर यांनी सांगितले. 

You cannot copy content of this page