महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त जिल्हा वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने मालवण येथे स्तुत्य उपक्रम

कोरोना विषाणूची जनजागृती करून मास्कचे वाटप

मालवण दि.०८-: महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने मालवण तालुक्‍यात ठिक-ठिकाणी कोरोना विषाणूची जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवून मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी नागरिकांना मास्क वापरा विषयी मार्गदर्शन केले. मालवण शहरात बसस्थानक परिसरात हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी उपस्थित प्रवासी, विद्यार्थी आणि रिक्षाचालकांना कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत मार्गदर्शन करून मास्कचे वाटप केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रताप नाईक, पोलीस हवालदार दिपक तारी, महेंद्र देऊलकर, महिला पोलीस नाईक दर्शना पालकर, पोलीस काँस्टेबल नितिन शेटये, गणेश सकपाळ, पोलीस पाटील वासू गावकर आदी उपस्थित होते. दरम्यान, शहराबरोबरच सुकळवाड, कट्टा बाजारपेठ, कुणकावळे, चौके याठिकाणी देखील कोरोनाबाबत मार्गदर्शन करून मास्क वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page