खारेपाटण बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे १३ मार्चला महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

कणकवली ता.१२-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बाल गोपाळ मित्र मंडळ खारेपाटण व एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग यांच्या सयूंक्त विद्यमाने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १३ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ ते दु.२ या वेळेत “वुमन्स वेल बिईंग शिबिर तथा महिलांसाठी मोफत आरोग्य शीबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मॅमोग्राफी,सोनोग्राफी,फिजिशियन कन्सलटेशन,फिजिओथेरपी कन्सलटेन्शन,डाएट कन्सलटेशन, ब्लड शुगर चेक,ब्रेस्ट क्लीनिकल एक्झामिनिशेन बाय लेडी गायनॅकोलॉजिस्ट,अस्थीरोग चिकित्सा,मोतीबिंदू चिकित्सा, शल्यचिकिस्ता आदी तपासण्या करणयात येणार आहेत.ज्या महिलांना या शिबिरामध्ये सहभाग घ्यावयाचा त्यांनी सौ. अंजली कुबल – ९०२८७३८००४, सौ.प्राची इसवलकर – ७६६६७७३७७४ तसेच अरविंद कुडतरकर (समजिक वैद्यकीय अधिकारी ),संदेश राणे (पी आर ओ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बाळ गोपाळ मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page