मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील काळेथर तारकर्ली येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सत्यवान संभाजी जावकर (९६) यांचे आज दुपारी पावणे बारा वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. अखंड रत्नागिरी जिल्हा असताना आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्यवान जावकर यांनी महसूल विभागात तलाठी आणि तद्नंतर मंडळ अधिकारी म्हणून काम केले. १९८२ साली ते वैभववाडी येथे मंडळ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती आज दुपारी त्यांच्यावर काळेथर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात ५ मुलगे, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे
सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सत्यवान जावकर यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन
