वेंगुर्ला ता.०३-:* नॅशनल बॅक आणि पतसंस्था यांच्यामध्ये मुलभूत फरक असतो. मोठे उद्योजक पतसंस्थेशी जोडले जाताना समाजाचा शेवटचा घटकही पतसंस्थेचा ग्राहक आहे. येथेच पतसंस्थेचे सहकारातील वेगळे स्थान अधोरेखित होते असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वेंगुर्ला येथील शाखेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपिठावर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, वेंगुर्ला शाखा चेअरमन किर्तीमंगल भगत, शाखाधिकारी अशोक मिटके आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आजरा, शाखा वेंगुर्ला या संस्थेची वेंगुर्ल्यातील २७ वर्ष तर मूळ स्थापनेची ५० वर्ष ही निष्कलंक वाटचाल आहे. आजच्या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार यांच्यामध्ये असलेला विश्वास पतसंस्थेची विश्वासपात्र, पारदर्शी कारभार म्हणून नावारुपाला आलेली ही परंपरा अखंडीत राहो अशा भावना अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांनी व्यक्त केल्या. अशोक मिटके यांनी पतसंस्थेचा आढावा घेताना ठेवीदार आणि कर्जदार यांच्या विश्वासार्हतेवरच पतसंस्थेचे कामकाज सुरु असल्याचे सांगत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण ठेव योजना आणि रिकरींग सुवर्ण ठेव योजनेविषयी माहिती दिली. तर संस्थेतील कर्मचा-यांची प्रामाणिकता, संचालकांवरील समाजाचा असणारा विश्वास यावर संस्थेची प्रगती असल्याचे किर्तीमंगल भगत यांनी सांगितले.
सुवर्ण महोत्सवी दिनाचे औचित्य साधून भरत सातोस्कर, आपा परब, के.जी.गावडे, मॅक्सी कार्डोज, सीमा मराठे, विनायक वारंग, प्रदिप सावंत, प्रथमेश गुरव या पत्रकारांचा, अनिल सौदागर, शिल्पा बोवलेकर, किरण तोरस्कर, साईप्रसाद नाईक, बाबू राऊत या शाखा सल्लागारांचा तर अरविद गोरे, सिद्धेश्वर प्रभूखानोलकर, देविदास वालावलकर, रमाकांत दाभोलकर, महादेव मोटे, शामसुंदर मुणनकर, बुधाजी येरम, चंद्रकांत भैरट, पांडुरंग मिसाळ, दिगंबर भगत, वासुदेव जोशी, अब्दुल रेहमान शेख, प्रतिभा बोवलेकर, आनंद रेडकर, पांडुरंग जामदार, सुनिल मठकर, उमेश मठकर यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
