सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय केंद्रावर बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था

मालवण : (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय या मुख्यकेंद्रावर व ४ उपकेंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या मुख्य केंद्र आणि टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, भंडारी ज्युनिअर कॉलेज, टोपीवाला MCVC कॉलेज आणि एम.जी. बागवे कॉलेज,मसुरे या  ४ उपकेंद्रावर ५५२ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळा तेथे परीक्षा उपकेंद्र असे धोरण यावर्षी राबविण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय प्राचार्या आणि केंद्र प्रमुख डॉ. उज्ज्वला सामंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page