शिवसेने केलेले आरोप खरे असल्याचे कारवाईवरून झालेय स्पष्ट

नागेंद्र परब, प्रदीप नारकर यांचे सत्ताधारी भाजपला टोला

सिंधुदुर्गनगरी ता ०३ वरिष्ठ स्तरावरून झालेल्या चौकशी अंती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अनेक घोटाळे झाले आणि भ्रष्टाचार झाले असल्याचे उघड झाले आहे. या भ्रष्टाचारात प्रथमदर्शी दोषी असणाऱ्या २०१२ ते आतापर्यंत कार्यरत असलेल्या अधिकारी -कर्मचारी यांचा समावेश असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. याची सुरुवात महिला व बालविकास सभापतींच्या स्विय्यसहाययक यांच्या निलंबनाने झाली असल्याचे सांगतानाच शिवसेना सदस्यांकडून जिल्हा परिषद कारभाराबाबत होत असलेले आरोप बिनबुडाचे नाहित हे स्पष्ट झाले असल्याची माहिती शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब आणि प्रदीप नारकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गटनेते नागेंद्र परब बोलत होते. यावेळी सदस्य प्रदीप नारकर, संजय पडते, राजेश कविटकर, नितीन शिरोडकर, अमरसेन सावंत ,शिवसेना महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत आदी उपस्थित होते. यावेळी नागेंद्र परब म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला मनमानी कारभार, त्याला अधिकाऱ्यांचे असलेले सहकार्य, स्वनिधि घोटाळा, वॉटर प्युरिफायर घोटाळा, देवगड पंचायत समिती शिक्षण विभाग घोटाळा, एलइडी घोटाळा महिला सदस्य अभ्यास दौरा, आदींबाबत शिवसेना सदस्यांनी आवाज उठवत कोकण आयुक्त आणि शासनाकडे तक्रार केली होती.

याबाबत वरिष्ठ स्तरावरून झालेल्या चौकशी अंती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अनेक घोटाळे झाले आणि भ्रष्टाचार झाले असल्याचे उघड झाले आहे. या भ्रष्टाचारात प्रथमदर्शी दोषी असणाऱ्या २०१२ ते २०२० पर्यंत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. याची सुरुवात महिला व बालविकास सभापतींच्या स्विय्यसहाययक यांच्या निलंबनाने झाली असल्याचे सांगतानाच शिवसेना सदस्यांकडून जिल्हा परिषद कारभाराबाबत होत असलेले आरोप बिनबुडाचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे .अशी माहिती शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब आणि प्रदीप नारकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद कडून सर्वांगीण विकास नाही तर सर्वत्र घोटाळा

जिल्हा परिषदेचे सत्ताधारी मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. मात्र विकास सोडून जिल्हा परिषद मध्ये सर्वत्र घोटाळ्याची मालिकाच सुरु असल्याचा आरोपही सदस्य प्रदीप नारकर यांनी यावेळी बोलताना केला.

You cannot copy content of this page