राहुल गांधीला शेतीतील काय कळतंय…?

*माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा घणाघात

*💫कणकवली दि.०७-:* राहुल गांधीला शेतितले काय कळतं ? असा थेट सवाल करत राहुल गांधी काहीही बोलतो असा घणाघात खासदार नारायण राणे यांनी भाजपाच्या ट्रॅक्टर रॅलीनंतरच्या सभेत केला.देशात कृषी विधेयकाला निव्वळ राजकीय फायद्यासाठी विरोध होत आहे. आज देशातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो आहे. या उद्धव ठाकरे ला आपल्या काय समजतं ? असा सवाल त्यांनी केला. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून उद्धव ठाकरे सरकार चालवत आहे.आतापर्यंत विकासकामांना फक्त स्थगिती देण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे . कोकणामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानानंतर वकोकणाला मदत देणार म्हणाला होता .आतापर्यंत काय दिले ? या उद्धवचे कोकणाशि वाकडे आहे असं प्रहार खासदार राणेंनी केला. राष्ट्रवादीचे नेते कोकणासाठी नवीन प्रकल्प करण्याची भाषा करत आहेत. पण आधी जे प्रकल्प अर्धवट आहेत ते प्रकल्प सुरु करा नंतर चर्चा करा असा टोला राणेंनी लगावला. पालकमंत्री उदय सामंत स्वतःच्या भावाला ठेके देण्यात गुंग आहेत अशी टीकाही राणे यांनी केली . देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे . कष्टकरी शेतकऱ्याचा फायदा व्हावा यासाठी कृषी विधेयक मोदी सरकारने आणले. सत्तर वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते आज् या विधेयकाने करून दाखवले. राज्यसभेत आजपर्यंत या कृषी विधेयकाला विरोध झाला नाही. शेतकऱ्यांचे हित साधणारे पंतप्रधान मोदी यांनी कृषी विधायक आणलं असे खासदार राणे म्हणाले.

You cannot copy content of this page