शांतादुर्गा हायस्कुलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

मालवण ता.०१-:* वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांच्या हस्ते ‘माय मराठी’या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेतील मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी भूषविले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी मराठी भाषेचे गौरव गीत गायले. तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेचे काव्यवाचन केले. समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द,अलंकारिक शब्द,म्हणी,वाक्प्रचार,कवी,लेखकांची,संतांची माहिती या सर्व घटकांचा संग्रह करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना आवडलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे ‘भित्तीपत्रक’म्हणून रेखाटली. त्याचप्रमाणे त्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी ‘पुस्तक परीक्षण’ देखील केले. या सर्व उपक्रमांचे प्रशालेत प्रदर्शन मांडण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवकालीन ‘कथाकथन स्पर्धा’आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमासाठी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक प्रसाद कुबल आणि शिक्षिका सौ.प्रीती सनये यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षिका सौ.वेदिका दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका कुमारी प्रतिभा केळुसकर यांनी केले. तर आभार प्रशालेतील विद्यार्थिनी मेघना करावडे हिने मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षिका प्रतिभा केळुस्कर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

You cannot copy content of this page