कामावरुन उशिरा घरी आला म्हणून पत्नीने अस्सं काही केलं की पती थेट रुग्णालयात दाखल

*💫भोपाळ,०७- :* मध्ये प्रदेशातून हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. तसं पाहता पती-पत्नीमधील भांडण हे नित्याचेच असतात. भांडण करुन नंतर ते गोडही होतात. मात्र काही वेळेस यामध्ये अनेक धक्कादायक घटनाही घडतात. अशीच एक घटना मध्यप्रदेशातील एका कुटुंबात घडली आहे. येथील एका पत्नीने झोपलेल्या पतीच्या चेहऱ्यावर गरम तेल ओतले. यानंतर तिचा पती गंभीररित्या भाजला गेला. सध्या त्याच्यावर बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदल्या रात्री झालं होतं भांडण सागर येथे राहणाऱ्या 38 वर्षीय अरविंद अहिरवार हा रोजंदारीवर काम करतो. 4 वर्षापूर्वी त्याचे शिवकुमारीशी लग्न झालं होतं. रात्री अरविंदच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार अरविदं आणि वहिणीत वाद झाला होता. यानंतर आई-वडिलांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवलं. पण दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता वहिणीने पती झोपलेला असताना त्याच्या चेहऱ्यावर उकळतं तेल ओतले, असे त्याने सांगितलं.

You cannot copy content of this page