सात जानेवारीला कणकवलीत होणार्या ट्रॅक्टर रॅलीची जय्यत तयारी सुरू

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खासदार नारायण राणे अनिल बोंडे राहणार उपस्थित

*💫कणकवली दि०६-:* मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ तळकोकणातील ट्रॅक्टर रॅलीची जोरदार तयारी कणकवलीत सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देणारे कृषी विधेयक मोदी सरकारने संमत केले आहे. केंद्र सरकारच्या य कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी भाजपाच्या वतीने कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली ७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. माजराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता मुंडे डोंगरी मैदान येथून ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होणार आहे. सुमारे १० हजार शेतकरी आणि भाजपा कार्यकर्ते सहभागी असणारी ही ट्रॅक्टर रॅली कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांची उपस्थिती रॅलीदरम्यान असणार आहे. तळकोकणातील सुमारे १० हजार शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा जयघोष या ट्रॅक्टर रॅलीद्वारे करणार आहेत. तळकोकणातील शेतकऱ्यांचा कृषी विधेयकाच्या समर्थानाचा आवाज देशाच्या दक्षिण टोक असलेल्या कोकणातून थेट दिल्ली दरबारी ७ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीतून पोचणार आहे. प्रांताधिकाऱ्यांना कृषी विधेयकाच्या समर्थनाचे निवेदन दिल्यानंतर कणकवली येथील भाजपा कार्यालयानजीक जाहीर सभेत रॅलीचे रूपांतर होणार आहे. कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी अभूतपूर्व अशा ट्रॅक्टर रॅली आणि सभेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे.

You cannot copy content of this page