मालवण ता.२४-:* आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या दर्शनासाठी आलेल्या मनसेचे एकमेव आमदार राजू पटेल यांचे आज मालवणात जल्लोषी स्वागत करण्यात आले मुंबई येथून आंगणेवाडी येथे येत असताना देऊळवाडा-आडारी रोड येथे आमदार पटेल हे येताच फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषी स्वागत मनसे मालवण तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांनी केले.
यावेळी मनसे तालुका सचिव विल्सन गिरकर , मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, ,तालुका उपाध्यक्ष उदय गावडे, मनविसे तालुका अध्यक्ष विनायक गावडे आदी उपस्थित होते.
