वेंगुर्ला ता.२४-:* परबवाडा ग्रामपंचायतमधील १४व्या वित्तआयोग निधीतून परबवाडा मुख्य रस्ता ते गवंडीवाडा सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य ग्लानेस फर्नांडिस व सखी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याला अडथळा ठरणारे झाड हे सांडये कुटूंबियांनी तोडल्याबद्दल सरपंच पपू परब यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी उपसरपंच हेमंत गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, संजय मळगावकर, अर्चना परब, कृतिका साटेलकर, ग्रामसेवक प्रविण नेमण, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब, मनवेल फर्नांडिस, सायमन आल्मेडा, राजाराम गवंडे, किशोर गवंडे, अजित गवंडे, शशिकांत गवंडे, विजय गवंडे, सावळाराम साळगावकर, सुरेश नवार, गिरीश सांडये, शेखर कोरगावकर, संदीप परब, फास्कु आल्मेडा, ओमकार साटेलकर, आदित्य परब, आदित्य कुडाळकर व शुभम कुडाळकर, ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश कपडोस्कर, राजा परब उपस्थित होते.
