तिरंगी भजन सामने तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली ता.१८-:* बंडया मालंडकर मित्र मंडळ आणि समस्त कसवण ग्रामस्थ यांचा संयुक्त विद्यमाने शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ राजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ठीक ८.३०वाजता महाराजांच्या स्मारकाचे पूजन आणि मानवंदना तसेच दुपारी ठीक ३.३० ते ६ वाजेपर्यंत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.रात्री ठीक ९ वाजता होणार तिरंगी भजनाचा जंगी सामना बुवा राजेंद्र घाडीगांवकर-रामगड तसेच बुवा प्रथमेश चव्हाण-फोडाघाट,तसेच बुवा सिद्धेश परब यांच्यात रंगणार आहे,तरी सर्व नागरिकांनी या शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बंड्या मालंडकर मित्रमंडळ आणि समस्त कसवण ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
