ओरोस ता.१७-:* नागरिकांना व्यक्तिगत लाभ देण्यासाठी महत्वाचा असलेला व इंधनासाठी आवश्यक असलेले शेष निधी गेली दोन वर्षे मालवण पंचायत समितीला मिळालेला नाही. त्यामुळे सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांना गेले आठ महिने खिशातील पैसे खर्च घालून पंचायत समितीचे गाडी फिरवावी लागत असल्याचा आरोप करीत मालवण सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुका सभापती, उपसभापती यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा पाताडे व परुळेकर यांनी केला असून शेष निधी मिळत नसल्याने नागरिकांचे होणारे नुकसान याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
