केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार उद्घाटन…
आंबोली ता.१७-: पुढे ढकलण्यात आलेले आंबोली येथील आपले सरकार सेवा केंद्र(csc) नवीन वास्तूचे उद् घाटन व स्वागत कक्ष ग्रामपंचायत येथील उद्घाटन सोमवारी २१ फेब्रुवारी केंद्रीय पर्यटन जहाज बांधणी जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत,सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणे,खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजन तेली,आमदार दीपक केसरकर,जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील,सभापती निकिता सावंत, गट विकास अधिकारी रवींद्र कणसे,सरपंच गजानन पालेकर,उपसरपंच दत्तू नार्वेकर,सदस्य महेश पावसकर,काशिराम राऊत,शंकर चव्हाण,सावित्री पालेकर,छाया नार्वेकर,स्वप्निता कर्पे,निधी गुरव, सारिका गावडे,साक्षी गावडे,ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहिरम उपस्थित राहणार आहेत.यावेळी उद्घाटन, हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच यांनी केले आहे.
