निवृत्त शिक्षिका स्मिता रेडकर यांची बांदा जी प शाळेला देणगी

मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ यांच्याकडे सुपूर्द केले पाच हजार रुपये

बांदा ता.०९-: बांदा निमजगा जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थिनी निवृत्त शिक्षिका स्मिता संजय रेडकर यांनी आपल्या शाळेला 5 हजार रुपयाची देणगी मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता राऊळ यांच्याकडे सुपूर्द केली आहे. स्मिता संजय रेडकर ह्या बांदा निमजगा या जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून, दत्तक पालक योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या शाळेला 5 हजार रुपयाची आर्थिक देणगी दिली आहे.

त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ, शाळा व्यवस्थापक समिती संदीप बांदेकर, उपाध्यक्ष शिल्पा सावंत, शिक्षिका सुपर्णा भाईप, मालू लांबर, मंगल हडबे आदी सर्व सदस्य, शिक्षक वर्ग यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ यांनी बांदा निमजगा जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page