देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीकरिता महाविकास आघाडी ,शिवसेनेच्या साक्षी प्रभू ,

भाजपच्या प्रणाली माने यांचे अर्ज दाखल!

देवगड ता.०८-:* देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा पदाकरीता महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार साक्षी गजानन प्रभू यांनी तर भाजपच्या वतीने नगरसेविका प्रणाली मिलिंद माने यांनी एकमेव उमेदवारी अर्ज मंगळवारी सकाळी निवडणूक निवार्चन अधिकारी तथा पीठासीन अधिकारी देवेंद्र तामोरे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांचेकडे सादर केला हे दोन्ही अर्ज छाननीत वैध ठरले. आहेत.

महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार साक्षी प्रभू यांचे अर्जावर सूचक रोहन विश्वनाथ खेडेकर ,आणि अनुमोदक म्हणून विशाल विकास मांजरेकर यांनी स्वाक्षरी केल्या . तर भाजप उमेदवार प्रणाली माने यांचे अर्जावर सूचक शरद ठुकरुल, व अनुमोदक म्हणून अरुणा योगेश पाटकर यांनी स्वाक्षऱ्या केल्याआहेत. शिवसेना उमेदवार समवेत शिवसेना संपर्क प्रमुख आप्पा पराडकर ,शिवसेना नेते संदेश पारकर,तालुका प्रमुख विलास साळसकर,युवा सेना प्रमुख निनाद देशपांडे,सौरभ माने,विभाग प्रमुख तुषार पेडणेकर,नगरसेवक संतोष तारी,अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तर भाजप उमेदवार समवेत माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर,योगेश चांदोस्कर ,योगेश पाटकर,मिलिंद माने,संजय बांदेकर ,नगरसेविका तन्वी चांदोस्कर,आद्या गुमास्ते,स्वरा कावले,ऋचाली पाटकर,मनीषा जामसंडेकर ,अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये महाविकास आघाडीची ९ नगरसेवक यात शिवसेना ८,राष्ट्रवादी १ असे ९ नगरसेवक असून भाजप चे ८ नगरसेवक विजयी झाल्याने ९ विरुद्ध ८ असे बलाबल आहे नगराध्यक्ष पदाची निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.त्याच दिवशी उपनगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी दाखल करण्यात येऊन उपनगराध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page