सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतसाठी २५६ उमदेवार रिंगणात

*८ उमदेवार बिनविरोध येण्याची शक्यता*

*💫सावंतवाडी दि.०४-:* तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता तालुक्यातील ११ ग्रामपंचायत मधून एकूण ३८२ पैकी आता २५६ उमेदवार ११९ जागांसाठी रिंगणात आहेत. यापैकी तळवणे ग्रामपंचायत मधून ४८ पैकी २१ उमेदवारांनी माघार घेतली असून आता २६ उमेदवार रिंगणात आहेत. तर चौकुळं येथून ३८ पैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली असून २६ उमदेवार रिंगणात आहेत. तर इन्सुली येथून ४० पैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून ३३ उमदेवार रिंगणात आहेत. तर आंबोली येथून ३७ पैकी १० जणांनी माघार घेतली असून २७ उमेदवार रिंगणात आहेत. तर कोलगाव येथून ६२ पैकी २६ अर्ज मागे घेण्यात आले असून ३६ उमदेवार रिंगणात आहेत. आरोंदा येथून २४ पैकी २४ ही उमेदवार रिंगणात आहेत. तर मळगाव ४४ पैकी ११ जणांनी माघार घेतली असून ३३ उमदेवार रिंगणात आहेत. तर आरोस येथे १५ पैकी ३ उमेदवारांनी अर्ज माघार घेतली असून १२ उमदेवार रिंगणात आहेत. डिंगणे येथील २० पैकी ८ उमेदवारांनी माघार घेतली असून १२ उमदेवार रिंगणात आहेत. तर दांडेली येथील २० पैकी ५ अर्ज मागे घेतले असून १५ उमदेवार रिंगणात आहेत. तर मळेवाड येथून ३५ पैकी १४ अर्ज मागे घेतले असून २० उमदेवार रिंगणात आहेत. तर डिंगणे येथून ५, आरोस येथून २, मळेवाड येथून १ उमदेवार बिनविरोध बिनविरोध येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You cannot copy content of this page