*💫मालवण दि.०४-:* मालवण तालुक्यात होऊ घातलेल्या सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिस ठाणे हद्दीतील कट्टा ग्राउंड येथे आज दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. यानंतर कट्टा, खरारे पेंडुर, कुणकवळे, गोळवण, डिकवल कुमामे, मसदे चुनवरे व विरण या ठिकाणी रुट मार्च घेण्यात आला. यात मालवण पोलिस ठाण्याचे ३ अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील १ अधिकारी, १८ अंमलदार, आरसीपी प्लाटून १ अंमलदार ३१ कर्मचारी सहभागी झाले होते.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांची रंगीत तालीम
