*💫दोडामार्ग दि.०४ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात मुदत संपलेल्या आयनोडे हेवाळे, कुडासे व तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आयनोडे हेवाळे मधून ०६ कुडासे मधून १० तर तेरवण मेढे मधून ०८ अर्ज मागे मागे घेण्यात आले. मागे घेतलेल्या अर्जा नंतर तेरवण मेढेत ०४,कुडासे ०२ तर आयनोडे हेवाळेत ०२ जणांची बिनविरोध सदस्य पदी निवड झाली आहे. उर्वरित जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात असून त्यांच्यात थेट लढत होणार आहे एकूणच ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय पक्षांनी पक्ष पातळीवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक गावात ग्रामविकास आघाडी तुन निवडणूक लढवून स्थानिक कार्यकर्ते याला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. तर चुरशीच्या होणाऱ्या या निवडणूकित कोण बाजी मारतो? हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे?.
ग्रामपंचातीच्या रणधुमाळीत कोण होईल सरपंच…?
