सावंतवाडीतील महिलेसाठी अनघोळकर बंधूंचे कर्नाटक येथे जाऊन रक्तदान…

युवा रक्तदाता संघटनेने मानले आभार…

सावंतवाडी : सावंतवाडी येथील फातिमा राऊत या रुग्णाला प्लेटलेट्स कमी झाल्याने रक्ताची तातडीने आवश्यकता होती. केएलई रुग्णालय बेळगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून रक्ताची आवश्यकता होती. यावेळी इंद्रनिल अनघोळकर, ओंकार अनघोळकर या दोन बंधूंनी कर्नाटक बेळगाव येथील केएलई रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये जात रक्तदान केले.

यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या विशेष प्रयत्नातून रक्तदाते उपलब्ध. सावंतवाडीतील रूग्णाला बेळगाव कर्नाटक मध्ये रक्तदान केल्याबद्दल अनघोळकर बंधूंचे युवा रक्तदाता संघटना व रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page